उद्यान मित्र व्हा!..निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा

– मनपाचा स्तुत्य उपक्रम “उद्यान मित्र”

– उद्यानांचा विकास आणि देखभाल दुरुस्तीकडे ठेवणार लक्ष

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानांचा विकास आणि देखभालीकडे लक्ष ठेवणे तसेच नागरिकांना उत्तम प्रकारच्या सुविधा मिळण्याकरिता मनपाद्वारे ‘उद्यान मित्र’ नेमण्यात येणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरातील नागरिकांमधून ‘उद्यान मित्र’ नेमण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, “उद्यान मित्र व्हा!” आणि निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

नागपूर शहरातील लहान मोठी उद्याने असून, या उद्यानाच्या चांगल्या प्रकारे देखभाली व संचालनाच्या कामामध्ये नागरिकांचा सहभाग राहण्याकरिता नागपूर महानगरपालिका नागपूर उद्यान विभागाद्वारे “उद्यान मित्र” यांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली. इच्छुक नागरिकांकरिता https://forms.gle/3J6td52NWrbkwvfC6 या संकेत स्थळावर “उद्यान मित्र” बाबत संपूर्ण माहिती दिली असून, येथे नोंदणी फॉर्म उपलब्ध आहे. याकरिता नागरिक 15 दिवसाच्या आत ऑनलाईन फॉर्म भरावा असे आवाहनही डॉ. लाडे यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे लहान, मोठी अशी एकूण १८२ उद्याने असून, मोठी उद्याने २६, मध्यम व लहान १५६ उद्याने आहेत. या उद्यानांमधील सुविधा व्यवस्थिती कार्यरत आहेत अथवा नाही याची पाहणी करून वेळेवर आवश्यक दुरूस्त्या सूचविणे व उद्यानांतील व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांमधूनच उद्यान मित्र नेमण्यात येणार आहेत.

उद्यान मित्रांच्या कामाचे स्वरूप उद्यानांची दैनंदिन साफसफाई पाहणे, हिरवळीच्या कामावर देखभाल व निगराणी ठेवणे, ग्रीन जीमची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, लहान मुलांच्या खेळण्यांची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, उद्यानाच्या विकासाची कामे सुचविणे, उद्यानातील कारंजे, स्थापत्य इतर कामांची पाहणी करणे, मनपाद्वारे बोलविण्यात येणा-या मासिक बैठकीत सहभागी होणे व मनपाकडून वेळोवेळी मागविण्यात येणारे अभिप्राय नोंदविणे हे असणार आहे. उद्यान मित्राबाबत कोणतीही तक्रार/विवाद उद्भवल्या, अंतिम निर्णयाचा अधिकार आयुक्तांचा राहिल, अशी माहिती उद्यान अधीक्षक अमोल चौरपवार यांनी दिली आहे.

उद्यान मित्रांकरीता निवडीचे निकष

– उद्यान मित्राचे वय २५ ते ८० वर्षा पर्यंत असावे.

– एका उद्याना करीता एकापेक्षा अधिक उद्यान मित्रांची निवड करता येईल.

– उद्यान मित्र शक्यतोवर उद्यानाच्या (२ किमी) परिसरातील रहिवासी असावा.

– उद्यान मित्रावर गुन्हे दाखल नसावेत (मनपा नागपूर कडून पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येईल.)

– सामाजिक कार्य, किंवा उद्यान शास्त्राचा अनुभव असलेल्यास प्राधान्य देण्यात येईल. अनुभव / कामाचे प्रमाणपत्र जोडावे.

– उद्यान मित्राचे कार्यक्षेत्र हे उद्यान देखरेख, स्वच्छता पर्यावरणाशी संबंधीत क्षेत्रात जनजागृती, वृक्ष लागवड, जतन इ. संबधीत महानगरपालिकेला अभिप्राय/ सुचना देणे क्षेत्रांशी मर्यादीत राहील.

– उद्यान मित्राला ओळखपत्र देण्यात येईल व त्याची वैधता कमाल तीन वर्षापर्यंत राहील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दारव्हा येथील आरोग्य शिबिरात १८०० रूग्णांची तपासणी व उपचार

Sun Jun 23 , 2024
– नागरिकांवर सर्व उपचार मोफत व्हावे हाच प्रयत्न – ना. संजय राठोड दारव्हा :- शासकीय रूग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार होतात. मात्र कर्करोग, किडनी, मेंदूविकार अशा आजारांवरील उपचार महागडे व खर्चिक आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा अशा महागड्या आजारांवरील उपचारासाठी एक रूपयासुद्धा खर्च होवू नये. त्यांच्यावर सर्व उपचार मोफतच व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. त्यामुळेच दर तीन महिन्यांनी तालुक्यात आरोग्य मोफत आरोग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com