खबरदार …जर विना परवानगी होर्डिंग लावाल तर – मुख्याधिकारी संदीप बोरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सध्या सणोत्सवाची रेलचेल असून काही दिवसानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे तेव्हा पोस्टर वार शुभेच्छुकांचा जणू काही वर्षाव होणार असल्याने वाटेल त्या ठिकाणी नगर पोस्टर, बॅनर ,होर्डिंग ची उभारणी करून देखावा करीत स्वतःची प्रसिद्धीचे चित्र निर्माण होणार असल्याचे दृष्टिक्षेपास येते मात्र हे सर्व प्रसिद्धीच्या झोकात जाहिरात होर्डिंग लावताना कामठी नगर परिषदची परवानगी घेणे बंधनकारक आहे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरात जाहिरात होर्डिंग लावण्यात येत असलेल्या जाहिरातीवर नगर परिषद द्वारे परवानगी देण्यात आलेले क्यू आर कोड लावणे बंधनकारक असल्याचे निर्देशित केले आहे तेव्हा खबरदार…विना परवानगी जाहिरात होर्डिंग लावाल तर…विना परवानगी होर्डिंग लावणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाही करण्यात येणार असल्याचा ईशारा मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे.

निवडणुकीची चाहूल लागण्याच्या मार्गावर असून राजकीय मंडळी ‘नाव मोठं’ या सदराखाली चौका चौकात होर्डिंग लावताना दिसणार आहेत तसेच नेत्यांचे वाढदिवस, सणोत्सव काळात काही हौशी मंडळी मुख्य चौकामध्ये होर्डिंग लावण्यात स्थानिक कार्यकर्ते रंगून गेली असतात .कामठी नगर परिषदची अधिकृत परवानगी न घेता विना परवानगी अनधिकृत होर्डिंग लावण्याचे प्रमाण वाढले असल्याने एकीकडे शासनाचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास येत असून या नियमबाह्य होर्डिंगस मुळे कामठी शहराचे ‘स्वच्छ व सुंदर शहर’ही संकल्पनाच धुळीस मिळाल्याचे चित्र निर्माण होत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी विना परवानगी होर्डिंग लावू नका असे आवाहन करण्यात आले आहे .

– होर्डिंग बॅनर वर क्यूआर कोड घेणे आवश्यक

-कामठी नगर परिषद ची परवानगी घेऊन लावण्यात येणाऱ्या जाहिरात होर्डिंग ,बॅनर वर क्यू आर कोड लावणे बंधनकारक आहे.या क्यू आर कोड मध्ये जाहिरातदाराची माहिती राहणार असून परवानगी घेण्यात आलेली तारीख, कालावधी नमूद होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या अथक प्रयत्नाला, यश रमा नगर रेल्वे फाटक मार्ग वाहतुकीस सुरळीत

Mon Oct 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनी भाविकगण कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देण्यास येणार आहेत. परंतु मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला रमानगर रेल्वे ओवर ब्रिजचे बांधकाम हे कासवगतीने सुरू असून रखडलेल्या बांधकाम स्थितीत या मार्गाहून वाहणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला पोहोचनारा मार्ग सोयीचा ठरत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!