बावनकुळे यांनी जनतेची दिशाभूल करणे सोडुन आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी 

– अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, आणि कोराडी देवस्थान आई जगदंबेच्या नावाने फोकनाड तानणे बंद करावे व सेवानंद विद्यालय शाळा शासनास हैंडओवर करावी

कोराडी :-  1)1917 पासुन कोराडी महालक्ष्मी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे शाळा आहे. चुकीची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देत आहेत.

मुळात ज्या शाळेची गोष्ट ते सांगत आहेत ती शाळा सन 1927 साली इंग्रजांच्या काळात आयरिन स्मार्ट बोस मैडम यांनी महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्कीम या शैक्षणिक संस्थेअंतर्गत स्थापना केली आणि कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान हे कोराडी ग्रा पं. हद्दीत येते तर महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्थेची शाळा ही महादुला नगरपंचायत अंतर्गत येते.

2) दरवर्षी 20 लाख भक्त कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात भेट देतात ही माहिती सुद्धा चुकीची आहे. फक्त नवरात्र काळात दरवर्षी 5 लाखापेक्षा जास्त भक्त येतच नाही. अन्यथा येथे मागच्या 2 वर्षात येथील दुकानदारांचा धंदा चौपट झाला नसता भीड नसल्याने दुकानदारांचा धंदा होत नाही अशी दुकानदारांची ओरड आहे त्यातच यात्रेच्या लिलावाच्या ठेकेदाराकडून दुकानदारांकडून होणारी लुट ही चिंता करणारी गोष्ट आहे.

3)सेवानंद विद्यालय या शाळेच्या संचालक अध्यक्षा म्हणून सन 2016-2024 मार्च पर्यंत ज्योती चंद्रशेखर बावनकुळे होत्या करोडो रूपयांची बेहिशेबी मालमत्ता व संपत्ती असणाऱ्या बावनकुळे यांच्या पत्नीला सेवानंद शाळेचा विकास करता आला असता. परंतु चंद्रशेखर बावनकुळे हे सन 2016-17 मध्ये आबकारी दारु उत्पादन व शुल्क विभागाचे (आबकारी) मंत्री असतांना त्यांनी युनायटेड ब्रेवरीज लि. या मद्यउत्पादक कंपनीकडून करोडो रुपयांचा CSR निधी घेऊन मंत्रीपदाचा गैरवापर करुन बावनकुळेनी स्वतःच्या खाजगी शाळेची ईमारत बांधुन विकास करुन घेतला. हे वास्तविक सत्य बावनकुळे किती दिवस लपवणार?

4) सेवानंद विद्यालय शाळेच्या विकासाची जबाबदारी श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी ने घेण्याची गरज काय? एकीकडे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत तर दुसरीकडे सेवानंद शाळा ही ज्या महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्थेची आहे, त्या संस्थेच्या अध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती चंद्रशेखर बावनकुळे ह्या आहेत. बावनकुळे यांना नेमके काय म्हणायचे आहे यातुन? … बावनकुळें परिवाराची वैयक्तिक मालमत्ता (प्रापर्टी) असलेल्या शाळेचा विकास करावयास बावनकुळे अपयशी /अयशस्वी ठरले असे बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? जर तसे असेल तर शासनाच्या पगारावर या शाळेचे शिक्षक काम करतात. ही शाळा शासनानेच टेकओवर करावी. म्हणजे सगळी भानगड मिटली…!

5) महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी व महादुला व्हिलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्था एकमेकात विलिन करा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय नागपूर यांना का केली? (जलै 2023) मध्ये. याचे बावनकुळे यांनी उत्तर द्यावे. या विलिनीकरणावर सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे महादुला कोराडी येथील समाजसेवी पत्रकार सुनील साळवे यांनी आक्षेप घेतले शैक्षणिक संस्था आणि धार्मिक संस्थेचे एकत्र विलिनीकरण होऊ शकत नाही. त्यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त संतोष कुर्वे यांनी सुनील साळवे यांचा आक्षेप आहे मंजुर केला. मग विलिनीकरण झाले कसे? (एप्रिल 2024)

6) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान चे सचिव दत्तु समरितकर यांनी तहसीलदार कामठी यांना कोराडी देवस्थानच्या विस्तारासाठी शासनाच्या जवळपास 22 एकर जागेची मागणी केली होती. परंतु तहसीलदार कामठी यांच्याकडे समाजसेवी पत्रकार सुनील साळवे, कोराडी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले व सभापती दिशा चनकापुरे यांनी आक्षेप नोंदवित ही जागा कोणत्या ही खाजगी संस्थेला देऊ नये महादुला नगरपंचायत तसेच कोराडी गावच्या गावठाण विस्तारासाठी राखुन ठेवावी अशी मागणी केली होती. इथे सुद्धा तत्कालीन तहसीलदार कामठी अक्षय पोयाम यांचेवर बावनकुळे यांनी राजकीय दबाव आणुन ही जागा ढापली आणि रातोरात अक्षय पोयाम यांची बदली सुद्धा बावनकुळे यांनी करवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

7) देवस्थान ट्रस्ट आहे, प्रायवेट ट्रस्ट नाही. ती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रायवेट संस्था नाही. असे बावनकुळे म्हणतात.. पण आम्ही ठासुन सांगतो की ही प्रायवेट ट्रस्ट बावनकुळे परिवाराची, त्यांच्या भाजप कार्यकर्ते, ठेकेदार यांचीच आहे. महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी ट्रस्ट मध्ये बावनकुळे यांचे खास ठेकेदार दोस्त अजय विजयवर्गी रा. कामठी यांना कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात सदस्य म्हणून घेतले कसे? अँड. मुकेश शर्मा(नागपुर), सुशिला रमेश मंत्री (भाजप नेते), असे एकुण 9 ट्रस्टी महादुला-कोराडीतील नसुन बाहेरचे आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात महादुला कोराडी परिसरातील लोकच ट्रस्टी असले पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु इथे राजकीय वशिला असलेले पैसेवाले महादुला-कोराडी बाहेरचे ट्रस्टी म्हणून श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात घेतले या सर्वांची हकालपट्टी झाली पाहिजे. दयाराम तडस्कर यांच्या म्रृत्युनंतर त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत तडस्कर याला सुद्धा ट्रस्ट वर घेतले. बावनकुळे यांची मर्जी सांभाळणाऱ्यांना या ट्रस्ट वर घेतले ते नियमबाह्य आहे. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.

8) 1 रुपयांत देवस्थान विद्यार्थ्यांना शिकवते हा खोटा अपप्रचार बावनकुळे यांनी बंद करावा कारण देवस्थान चा संबंध या सेवानंद शाळेसोबत आता चार महिन्यात जोडला गेला आहे. याआधी ही सेवानंद शाळा बावनकुळे परिवाराची होती. या शाळेवर त्यांची पत्नी ज्योतीताई चंद्रशेखर बावनकुळे होत्या तर बावनकुळे यांचे मामेभाऊ जयेंद्र बर्डे यांच्या पत्नी रंजना जयेंद्र बर्डे सचिव आहेत तर सहसचिव बावनकुळे यांची मुलगी कु. पायल चंद्रशेखर बावनकुळे सहसचिव आहे. आजपर्यंत कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ने कोणते सामाजिक कार्य उपक्रम राबविले महादुला कोराडी परिसरात जेव्हा पासुन चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष बनले. हे बावनकुळे यांनी सार्वजनिक रित्या जाहीर करावे. तसेच 800 विद्यार्थ्यांची यादीही बावनकुळे यांनी जाहीर करावी. कारण या शाळेत 800 विद्यार्थी शिकतच नाही.विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

9) देवस्थान ने महिलांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला. असे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना बावनकुळे यांनी सांगितले. मागील 10 वर्षापासून चंद्रशेखर बावनकुळे हे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट वर आहेत आजपर्यंत त्यांनी कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या देवस्थानच्या माध्यमातून किती स्वयंरोजगार /व्यवसाय उपलब्ध करुन दिले हे ही जाहीर करावे. दिशाभूल करण्यात आणि मंदिर देवस्थानच्या नावाने स्वतःचा वैयक्तिक विकास बावनकुळे यांनी केला त्यांनी कोराडी मंदिर देवस्थानासाठी शासनाकडून आणलेल्या 300 करोड रुपयांच्या कामाचे शासकीय आँडिट झाले पाहिजे कारण या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur Waldorf Inspired School (NWIS)

Tue Oct 8 , 2024
Nagpur :-The goal of a Waldorf Educator is to develop a child’s mind, body and spirit by cultivating the imagination, awakening a sense of truth and inspiring a feeling of responsibility. What better place than a Farm to explore the process of farming, growing fruits and vegetables? Teachers and the Kids of Kindergarten and Grades (I, II and III) of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!