नागपूर :-नागपूरातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पहिला जत्था तिरुपतीकडे रवाना होऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, बबनराव नाखले यांनी सुकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. ओबीसी कार्यकत्यांनी आपला अमूल्य वेळ काढून रेल्वे स्टेशनवर येऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना विचारना केली. तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांना काही अडचण आली तर फोन करावे असे तायवाडे यांनी म्हटलं आहे.
ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशनच्या वेळी नागपूर शहरातील दिग्गज नेते, आमदार, खासदार, सर्व मोठ मोठे पदाधिकारी, व ओबीसी कार्यकर्ते या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील. तसेच सचिन राजूरकर, परमेश्वर राऊत, गणेश्वर आरिकर, ऋषभ राऊत, सुषमा भड व रेखा बाराहाते यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. ओबीसींचा पहिला जत्था रेल्वेस्टेशन वरून रवाना होऊन बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर ओबीसी समाज बांधवांनी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोरडे व त्यांच्या संपूर्ण चेमुसह आरिकररांचे स्वागत केले. असे विदर्भ खैरे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांनी सांगितले आहे.