बॅरी, राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी प्रारंभ सोहळा,उद्घाटन समारंभ आज 

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान मानसपुत्र ,आंबेडकर चळवळीचे जेष्ठ रांस्ट्रिय लोक नेते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष आणि राज्य सभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्म शताब्दी वर्ष 25 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे .

बॅरी राजाभाऊ खोब्रागडे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नंतर आंबेडकरी आंदोलन आणि रिपब्लिकन चळवळीला गतिमान करून मागासवर्गीय व बहुजन समाजाला सामर्थ शाली बनविण्यासाठी रिपब्लीकन पक्षाचा देशभरात विस्तार करून,आरक्षण भूमिहीनांना जमीन, बौद्ध करीता सवलती,इतर मोठ मोठे आंदोलन केली,आयुष्यभर गोरगरिबांसाठी आंदोलने केली.

अश्या या थोर निष्ठावान नेत्यांच्या जीवन कार्याला उजाळा देऊन नवीन पिढीला त्या पासून प्रेरणा आणि नवीन ऊर्जा मिळावी,या उद्देशाने बॅरी राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरा करण्याचे त्यांच्या अनुयायांनी साजरा करण्याचा मानस केला आहे.

मुख्य उद्घाटन सोहळा बुधवार दि,25 सप्टेंबर ला सायंकाळी,430 वाजता,डॉ बाबासाहेब आंबेडकर कव्हेशन सेंटर, कामठी रोड,नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश,आणि सुप्रसिद्ध विचारवंत, न्याय मूर्ती बी जी, कोळसे पाटील यांचे सुभ हस्ते,या समारोहाचे उद्घाटन होईल,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत,डॉ सुखदेव थोरात,भूषविणार आहेत,प्रमुख अतिथी म्हणून,जेष्ठ रिपब्लिकन नेते,आणि विचारवंत,प्रा अशोक गोड घाटे,उतर नागपूर चे आमदार डॉ नितिन राऊत,जेष्ठ रिपब्लिकन नेते मारोतराव कांबळे,जेष्ठ साहित्यिक, ताराचंद खांडेकर, जेष्ठ कवी इ मो नारनवरे,प्रा गौतमी खोब्रागडे,डोंगरे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती,आयोजन समितीचे,एन टी मेश्राम,अशोक कोल्हटकर, भीमराव वैद्य,सुरेश पाटील नरेश वाहने महेंद्र गायकवाड,अशोक बोंधाडे,प्रा,भोवते,मिलिंद मेश्राम डॉ,मच्छिंद्र घोडमोरे,उमेश बोरकर , विलास गजभिये,तक्षशिला बागधरे,प्रा तुळशा डोंगरे आदींनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा

Wed Sep 25 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व डॉ. गिरीश आत्राम यांची उपस्थिती लाभली होती. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ.  गिरीश आत्राम  यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com