संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी पत्रकार संघाच्या वार्षिक कार्यकारीणीचा आजपासून श्रीगणेशा
कामठी :- समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व ते प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे सर्वात मोठे कार्य हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्थानिक पत्रकार करीत असतात.
अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचे व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. तेव्हा समस्त पत्रकारानी संघटित राहून सामाजिक बांधिलकी जोपासून संघटनात्मक पद्धतीने पत्रकारिता करता यावी या मुख्य उद्देशाने आज 19 सप्टेंबर ला श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून दुपारी साडे बारा वाजता नूतन सरस्वती विद्यालय सभागृहात वरिष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली कामठी पत्रकार संघाची विशेष सभा घेण्यात आली.या सभेत कामठी पत्रकार संघाची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली.ज्यामध्ये कामठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमत चे पत्रकार बंडू नारनवरे तर सचिवपदी दैनिक देशोन्नतीचे पत्रकार संदीप कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.व या वार्षिक कार्यकारिणीचा श्रीगणेशा करण्यात आला.
कामठी पत्रकार संघाची एक वार्षिक कार्यकारिणीत अध्यक्षपदी बंडू नारनवरे (लोकमत) तर सचिवपदी संदीप कांबळे(देशोन्नती),कार्याध्यक्ष सतीश दहाट,(सकाळ),
उपाध्यक्ष वाजीद अली(नॅशनल संदेश), निलेश रावेकर(युसीएन),सहसचिव हरीश शर्मा(दैनिक भास्कर),सुनील चलपे(लोकशाही वार्ता),कोषाध्यक्ष राजेश देशमुख(तरुण भारत),प्रसिद्धी प्रमुख योगेश शर्मा(युवराष्ट्र दर्शन)तसेच मुख्य सल्लागार व सदस्यपदी सुदाम राखडे(लोकमत),आशिष दुबे(लोकमत समाचार),
श्यामलाल शर्मा(दैनिक भास्कर),राकेश फेंडर(दैनिक नवभारत),नितीन रावेकर(महाराष्ट्र 24),सुरेश अढाऊ (दैनिक महासागर)ची नियुक्ती करण्यात आली.