नागपूर :- नुकत्याच झालेल्या २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरीषद व अभ्यास मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा नागपूरच्या महाविद्यालयातील प्रा.डॉ.विद्या साबळे ह्या विद्यापीठ शिक्षण मंच पॅनल तर्फे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या. या निवडणुकीमध्ये त्यांनी सर्वाधिक मते घेऊन पराक्रमी विजय मिळविला.करिता सदर महाविद्यालयाद्वारे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात अंबे दुर्गा एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष मनोज बालपांडे, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन व पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन दूमोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी प्रा.डॉ.विद्या साबळे यांचे अभिनंदन केले तसेच शाल व श्रीफळ ने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ.विद्या साबळे यांना पुढच्या कामाच्या वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.डॉ.विद्या साबळेंनी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य व विद्यार्थ्यांचे आभार मानले.