शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी

 

बैलगाडी प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण

बैलगाडी शर्यत प्रेमी आणि शेतकरी आनंदी

नागपूर दि. 16 :- राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे.बैलगाडी प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडी शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडीप्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पुर्तता आज झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्री श्री.केदार म्हणाले, गेली 4 वर्षापासून बैलगाडी शर्यत बंद होती. शासनाने बैलगाडी शर्यत प्रेमींना आश्वस्त करुन, न्यायालयात शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजू मांडली. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा विषय होता या निर्णयामुळे ते आनंद व्यक्त करीत आहेत. बैलांवर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या निर्णयामुळे त्यांना अर्थिक हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैलगाड्या शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्री.मुकुल रोहतगी तसेच ॲड.सचिन पाटील यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय यांनी २०१४ मधील आदेशातील तरतुदीचा विचार करून तसेच महाराष्ट्र राज्याने २०१७ साली बैलगाडी शर्यतबाबत केलेला कायदा व त्या अंतर्गत गठित नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यासाठी समान न्याय गृहीत धरून बैलगाडी शर्यतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून राज्य शासनाने बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत १९६० चा कायद्याला अनुसरून जी नियमावली केली आहे, त्या नियमावलीला अधीन राहून बैलगाडी शर्यती सुरू करण्यास परवानगी दिलेली असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

– दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वृक्षारोपण : रहाटे कॉलोनी चौक से जीरो माइल चौक तक फ्लाई ओवर के दीवार पर किया गया वृक्षरोपण ? 

Thu Dec 16 , 2021
नागपुर – राज्य सरकार की संबंधित विभाग की लापरवाही से फ्लाईओवर के दीवारों पर जगह जगह पीपल के वृक्ष लहलहा रहे है,जिसे सिरे से नज़रअंदाज किया जा रहा। यही आलम रहा तो दीवार फाड् देगी,एक दिन पीपल के उक्त पेड़। विभाग पुलिया निर्माण में रुचि रखता है लेकिन देखभाल में रत्ती भर ध्यान नही देता,नतीजा उक्त समस्या और दीवारों पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!