काटोल/कोंढाळी :- कोंढाळी येथील स्व. राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बहिरम बाबा देवस्थान खापा (सोनार)येथ ‘डिजिटल लिटरेसी ‘या थीमवर 19 जाने. ते 25 जाने. 2025 या कालावधित करण्यात आलेले आहे.
20 जानेवारी 2025 ला सकाळी 11 वाजता महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ सदस्य दुर्गाप्रसाद पांडे यांच्या अध्यक्षतेखाली, ग्राम सोनार खापाचे सरपंच देवेंद्र मरस्कोल्हे यांच्या शुभ हस्ते, ग्रामपंचायत सोनार खापा चे ग्राम सचिव देवेंद्र उमप ,बहिरम बाबा देवस्थानचे ट्रस्टी उत्तमराव गिरडकर, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राजू खरडे व रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू अंबाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. लोमेश्वर घागरे, डॉ. गोपीचंद कठाणे, डॉ प्रज्ञासा उपाध्याय व डॉ. हरिदास लाडके यांची सुध्दा प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रा.डॉ.लोमेश्वर घागरे यांनी प्रस्ताविकेमधून रा.से.यो.ची भूमिका आणि कर्तव्य शिबिरार्थीना समजून सांगितले तर कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्र मरस्कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना;महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना श्रमाची सवय लागावी, वास्तव पातळीवर जीवनात कसलाच न्युनगंड नसावा हेच मूल्य आणि उद्देश रा.से .यो. चा आहे असे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी देवेंद्र उमप यांनी रा.से. यो. चा विद्यार्थी हा समाजाभिमुख नागरिक व्हावा त्याचबरोबर त्याला व्यवहारिक पातळीवरील विविध ज्ञान शाखांचे ज्ञानग्रहण करण्याची जाणीव आणि जागृती व्हायला हवी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना रासेयो चा हेतू काय? त्याचा अर्थ काय? हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना ही आपल्या स्वतःच्या गावातूनच सुरू होते हे जागरूक दृष्टीने विद्यार्थ्यांनी बघले पाहिजे गावांमध्ये असणाऱ्या समस्यांचा पाठपुरावा ग्रामसभेमध्ये मांडून त्याची पूर्तता शासकीय पातळीवर, राजकीय पातळीवरून करून घेतली पाहिजे आणि याची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्यापासून करावी तरच त्याच्या अंगी नेतृत्वाची गुण निर्माण होईल व देशाला भावी नेतृत्व प्राप्त होईल असे मत व्यक्त केले.
या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.हरिदास लाडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. गोपीचंद कठाणे यांनी मानले.