सावनेर :- श्री क्षेत्र वाकी येथे ३ मार्च पासून बाबांच्या ८१ व्या वार्षिक उर्सला सुरुवात झाली.ताजबाग नागपूर येथून शाहीसंदल निघून वाकी येथील प.पु. काशिनाथ डहाके (पाटील) यांच्या वाड्यात पोहोचला.तेथून सायंकाळी ५.३० वा.वाकी दरबार येथे पोहोचुन परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डाहाके (पाटील) यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.
या वार्षिक उर्स चे उद्घाटन सायंकाळी ६ वा. सुनील केदार माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ता कोकड्डे अध्यक्ष जि.प.नागपूर,सय्यद जरबीर ताजी सज्जादा नशीन ताजबाग शरीफ नागपूर,ताज अहमद राजा सचिव ताजबाग ट्रस्ट नागपूर व हाजी इम्रान ताजी ट्रस्टी ताजबाग शरीफ नागपूर या मान्यवरांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते महापूजा होऊन उर्सला सुरुवात झाली.
दि.३ मार्च ला असंख्य भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले.हा उर्स दिनांक ९ मार्च पर्यंत राहील. तसेच ४ मार्च ला सीमादेवी कोठारी यांनी दरबाराला भेट दिली.त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होईल.६ मार्च ला राजे रघुजीराव भोसले व राजे मोधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल.
दररोज सायंकाळी भाविकांना ट्रस्टतर्फे महाप्रसाद वितरित करण्यात येईल. अन्नदान करणाऱ्यांनी ट्रस्ट सोबत संपर्क साधावा असे आव्हान अध्यक्ष प्रभाकर डहाके (पाटील), सचिव ज्ञानेश्वर डहाके(पाटील),विश्वस्त मधुकर टेकाडे,सचिन डांगोरे यांनी केले आहे.