संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 3:-मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या 101 व्या जयंती निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक व बहुउद्देशीय संस्था कामठी आजनी येथील परमात्मा एक भवन येथे सेवक सेविकांच्या उपस्थितीत बाबा जुमदेव जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शिका सरस्वतीबाई मोहतुरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार तांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा बैठक घेण्यात आली .
याप्रसंगी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले संपुर्ण जीवन गोर गरीब, दुःखी, कष्टी, व्यसणाने त्रस्त लोकांचे जीवन अंधश्रद्धा पासून दूर करण्यासाठी निष्काम भावनेने कार्य केले तसेच समाजातील दुःखी कष्टी अज्ञानी मानवास व्यसन अंधश्रद्धेतून मुक्त केले. अनेकांना बाबाच्या शिकवणीचा प्रभाव पडल्याने सेवक सेविकानी मानव धर्माचा मार्ग पत्कारला. बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने लाखो लोक व्यसनमुक्त होऊन सुखी झाल्याचे मत सेवक प्रदीप भोकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. तसेच चर्चा बैठकीचे आभार प्रदर्शन करीत सर्वांना बाबा जुमदेव जयंती च्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शिका सरस्वतीबाबाई मोहतुरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार तांडेकर, रुपचंद कोचे,प्रदीप भोकरे, आसाराम हलमारे,हरिष भोयर,रवी मोहतुरे, शिवशंकर हलमारे,गंगाधर सावरकर, विष्णू देवांगण, मंगला नारनवरे,भणारे बाई, कविता मोहतुरे,मंदा ठवकर, सारिका कनोजे, यासह मोठ्या संख्येत सेवक सेविकागण उपस्थित होते.
कामठी येथे महानत्यागी बाबा जुमदेव जयंती उत्साहात साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com