संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ,१२, वी कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या आयशा नसीम, इशांक तेलंग, अभिमन्यू कुशवाह या तीन विद्यार्थ्याची निवड राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांनी काढलेल्या प्रसिध्दीला दिलेल्या पत्रातून कळविले आहे.
आधी या तीनही विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर द्वारा आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला.आयशा नसीमने थाळीफेक २६मीटर प्रथम हातोडा फेकसाठी विभागीयस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर इशांक तेलंग याने हातोडा फेक ,३६, मीटर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.व तसेच अभिमन्यू कुशवाह यांनी हातोडा फेक २३ मीटर मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.
पोरवाल महाविद्यालय खेळाच्या बाबतीत प्रसिद्ध असून या तिन्ही विद्यार्थ्यानं पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा प्राध्यापिका मल्लिका प्रभाकर नागपुरे यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण, उपप्राचार्य सुनिता भौमीक, पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल आदींसह सर्व प्राध्यापक वृदांनी सर्व विजेता विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुधील राज्यस्तरिय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या आहेत.