संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत रनाळा ओमनगर दुर्गा माता मंदिर सभागृहात सायबर गुन्ह्याविषयी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, पोलीस उपयुक्त निकेतन कदम, यांच्या आदेशानुसार नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते जनजागृती अभियानाची सुरुवात नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राज येवले उपस्थित होते जनजागृती अभियान अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक राज येवले यांनी सायबर गुन्हे विषयी माहिती मार्गदर्शन करताना म्हणाले अनओळखीच्या व्यक्तीबरोबर कोणतेही व्यवहार करू नये, अनओळखी व्यक्ती आपनास पैशाचे मोठ्या प्रमाणात आमिश दाखवून इंटरनेट बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून ऑनलाईन फ्राड करून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्याचे गुन्हे घडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे त्याकरिता प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नये त्यांना मोबाईल नंबर देऊ नये, सोबतच आपल्या व इतर ओळखीच्या व्यक्तीची गुप्त माहिती देऊ नये अनेक तरुण मोबाईल वरून इंटरनेटच्या माध्यमातून विविध आमिषाला बळी पडून नेट बँकिंग चे व्यवहार करीत असतात ओटीपी नंबर, मोबाईल नंबर अनओळखीच्या व्यक्तीला देऊ नये सोबतच मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी व्यसनाधीन झाली असून मिळेल त्या वाम मार्गाने पैसे जुळवण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे सोबतच वाईट व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले जनजागृती अभियानाला ओमनगर दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष कन्वर्सिंग पगाल, उदयसिंग यादव, सौमित्र नंदी ,अनुसिंग सिंधिया ,नीलम बघेल, दीपक निकोसे ,राजकुमारसिंग बघेल ,रश्मी जैन, पुरुषोत्तम वघरे ,दिपाली देवकर, रेखा केळझरकर, रेखा पगाडे, रेखा जयस्वाल ,बबीता यादव,वैशू रेवतकर सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.