नायलॉन मांजाचा वापर टाळा, दुचाकी वाहनचालकांनी काळजी घ्यावी : पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांचे आवाहन

नागपूर  :   मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचे आवाहन केलेले आहे. पतंग उडविण्याचा आनंद ही या सणाची पर्वणी. मात्र, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांनी भीतीचे वातावरण निर्माण होते. नायलॉन मांजावर बंदी आहे व पोलीस प्रशासन कायदेशीर कार्यवाही करीत आहेत. मात्र जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपल्या आसपास नायलॉन मांजाची विक्री निदर्शनास आल्यास प्रशासनास कळवावे, अशी कळकळीची विनंती राऊत यांनी केली.

विजेच्या तारांवर अडकलेला पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. उंचावरून पतंग उडवताना इमारतींच्या कठड्याजवळ उभे राहू नये. घरावरून विजेची तार गेली असल्यास पतंग उडवताना सावध राहा. पतंग उडवताना विजेची तार, फीडर व वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. कटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर वेडेवाकडे धावू नये. लहान मुलांच्या हातात मांजा देताना सावध राहणे गरजेचे आहे, मांजा धारदार असल्याने बोटे कापण्याची शक्यता असते. पतंग उडवताना रेल्वे रुळ परिसरापासून दूर राहा. नायलॉन मांजा तसेच प्लास्टिक पतंगामुळे पक्षी आणि माणसांचेही प्राण जाऊ शकतात.

दुचाकी वाहनचालकांनी पुढील आठवडा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपले वाहन सावधतेने चालवा. लहान मुलांना बाईकवर पुढे बसवू नका. पतंगाच्या दोरामुळे लहान मुलांच्या मानेला, चेहऱ्याला, डोळ्याला इजा होऊ शकते. हेल्मेटचा नियमित वापर करा व वाहन चालवताना गळ्याभोवती मफलर किंवा रुमाल गुंडाळून घ्या. अश्या प्रासंगिक सूचना करून पालकमंत्री डॉ राऊत यांनी तिळगुळाचा गोडवा नातीगोती व मैत्री मधेही असो, असे अभिष्टचिंतन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी काव्यलेखन स्पर्धा

Fri Jan 14 , 2022
भंडारा : महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीचा दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 14 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन ‘स्वरचीत मराठी काव्य लेखन स्पर्धा’ आयोजीत करण्यात आली आहे. सर्व काव्य प्रेमींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!