प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नागपुर : राज्यामध्ये महाऊर्जामार्फत नवीन व नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा संवर्धनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना वेस्ट टू एनर्जी, बायोमास, बायोगॅस कार्यक्रम राबवायचे असल्यास त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यासाठी वेस्ट टू एनर्जी कार्यक्रम 600 कोटी रुपये, बायोमास कार्यक्रम 158 कोटी रुपये व बायोगॅस कार्यक्रमासाठी 100 कोटी रुपये असे 858 कोटी रुपयाची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. ग्लासगो येथील कराराच्या मानकानुसार 50 टक्के इतकी ऊर्जा सन 2030 पर्यंत अजीवाश्म इंधन स्त्रोतापासून निर्माण करण्यास कटीबध्दता दर्शविली आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात देशात राज्य अव्वली स्थानावर येण्यासाठी यातील उपलब्ध अनुदानाचा वापर जास्तीत जास्त करावा. इच्छूकांना http/biogas.mnre.gov.in किंवा www.biourja.mnre.gov.in या पोर्टलचा वापर करुन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन वैभवकुमार पाथोडे, विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा नागपूर यांनी आवाहन केले आहे. संबंधित माहितीकरिता महाऊर्जा विभागीय कार्यालय, पहिला माळा, दुग्ध विकास कर्मचारी संस्था, जी.पी.ओ. चौक, सिव्हील लाइन्स, नागपूर येथे संपर्क साधावा
@ फाईल फोटो