राज्यपालांच्या प्रजासत्ताक दिन चहापानाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

मुंबई :- देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि २६) राजभवनाच्या हिरवाळीवर निमंत्रितासाठी चहापानाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विविध देशांचे मुंबईतील राजदूत, उद्योजक, सशस्त्र सैन्य दल, प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी आणि विविध क्षेत्रातले मान्यवर चहापानाला उपस्थित होते.

विद्यापीठांमधील नव संशोधन व स्टार्टअपच्या प्रदर्शनाला राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट

नुकत्याच झालेल्या आंतर विद्यापीठ अविष्कार संशोधन महोत्सवात निवडल्या गेलेल्या व विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २७ नवसंशोधन व स्टार्टअप संकल्पनांचे प्रदर्शन राजभवनाच्या हिरवळीवर मांडण्यात आले होते.

राज्यपालांच्या चहापानापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व युवा संशोधकांना कौतुकाची थाप दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार - बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

Fri Jan 27 , 2023
मुंबई  – आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 30 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!