कन्हान :- जीवे मारण्याचा प्रयत्न सह इतर कलमानव्ये आरोपी विरुध्द मा. प्रथम श्रेणी फौजदारी न्यायालय यांच्या आदेशाने एट्रासिटी सह जीवे मारने व इतर कलमानव्ये कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी आनंद नगर कन्हान निवासी कपिल रंगारी असे तर आरोपीत रितेश पांडे, उमेश यादव ,अतुल तिवारी कन्हान कांद्री निवासी असे आरोपीची नावे आहेत.
नमूद आऱोपी यांनी फिर्यादिवर दिनांक 8 मे 2024 च्या रात्रि 12 : 30 वाजता सुमारास तेजाब कंपनी ग्राउंड कन्हान येथे आरोपी यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला ,खिश्यात असलेले पैसे हिस्कावून नेले व जातिवाचक शिविगाळ केली , तसेच फिर्यादि व त्याचा मित्रा विरुद्ध खोटी तक्रार देवून गुन्हा दाखल केला आणि फिर्यादी सोबत झालेले घटनाची तक्रार कन्हान पोलिसांनी फिर्यादि यांची तक्रार सुद्धा घेतली नसल्याने फिर्यादि कपिल रंगारी यांनी न्यायलयात दाद मागितली व न्यायालयाने आरोपी रितेश घनश्याम पांडे, उमेश चंद्रिकाप्रसाद यादव,अतुल अशोक तिवारी कन्हान कांद्री निवासी विरुद्ध एट्रासिटी सह इतर 392,307,294,4/25,34 सह कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यास आदेश दिले आहेत. फिर्यादिची बाजू ॲड़ हुमने यांनी मांडली.