संदीप कांबळे, कामठी
हुकुमचंद आमधरे यांनी आरोप करून केला घटनेचा निषेध
कामठी ता प्र 10 :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सिल्वर ओक बंगल्यावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. बंगल्यावर चपला व दगड मारून आंदोलन केले. या मागे कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे. असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडक शासन व्हावे कायदा हातात घेणारे लोकांना त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते हुकुमचंद आमधरे यांनी केली. तसेच हा भारतीय लोकशाहीवरील हल्ला असून राज्य घटनेच्या मूलभूत अधिकाराचे हनन करणारी घटना असल्याचे सांगून त्यांनी या घटनेचा निषेध केला.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा हुकुमचंद आमधरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निषेध केला. त्यांनी आपल्या म्हटले आहे की, आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील, त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला;मूलभूत अधिकाराचे हनन करणारा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com