रामटेकच्या नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास घेत प्रशासनाचे मानले आभार…..
रामटेक -रामटेक बसस्थानक चौकातील वर्तुळाकार रस्ते दुभाजक तत्काळ हटविण्याबाबत शिवसेना काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप पदाधिकारी सह विविध संघटना ने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना निवेदन देण्यात आले होते.अनेक दिवसापासून निवेदने देणे आंदोलने करणे सतत सुरूच होते….
अखेर शिवसेना पदाधिकारी यांनी देखील निवेदन दिलीत . दखल न घेतल्यास आंदोलनाचा देखील इशारा ह्यावेळी देण्यात आला होता. निवेदनाची तत्काळ दखल घेत बसस्थानक चौकातील वर्तुळाकार रस्ता दुभाजक राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे हटविण्यात आले.

रामटेक-मनसर राज्य मार्गावर . उपरोक्त वर्तुळ हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेले होते. शितलवाडीकडून रामटेकला येणारे,रामटेक कडून शितलवाडीला जाणारे व रामटेक बायपासवरून येणार्या वाहनांमध्ये अपघात झालीत. यापूर्वीदेखील याच ठिकाणी अनेक अपघात होऊन वाहनधारक जखमी झाले होते. पुढे कुठलाही अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी बसस्थानक चौकातील वतरुळाकार रस्ता विभाजक हटविण्याबाबत अनेक दिवसापासून विविध पक्षांकडून निवेदने दिलीत अनेक आंदोलने केलीत. संबधित प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत बसस्थानक चौकातील अपघातग्रस्त रस्ता दुभाजक तत्काळ काढून टाकल्या. व वर्तुळ छोटा केला.यामुळे रामटेकच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेऊन प्रशासनाचे आभार मानले……