रामटेक :- नुकतीच पं. स . रामटेक येथे मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक श्री इलामे सर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जखलेकर तसेच पंचायत समिती चे गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे उपस्थित होते. यावेळी खालील विषयाबाबत आढावा घेण्यात आला.
1. ODF PLUS जाहीर करावयाची गावे मधील मार्गदर्शक सूचनेतील संपूर्ण कामे करुन पडताळणी करुन पुर्ण करावी व नंतरच गावे खऱ्या अर्थाने घोषित करावी
2. सांडपाणी घन कचरा ची कामे तातडिने पूर्ण करणे.गावात ओला व सुखा कचरा संकलन तथा विल्हेवाट व प्लास्टिक कचरा जमा करुन त्याचा डांबरी रोड बांधकाम साठी वापर
3. सन 2021/22 ची सार्वजनिक शौचालय ची कामे तातडीने सुरु करणे व सर्व परिपूर्ण वेवस्था विधुत, पाणी,नियमित सफाई, इत्यादी सह पुर्ण करुन वापरात आणावेत
4. वैयक्तिक शौचालय बांधकामं तातडीने सुरु करून डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण करणे
5. जल जिवन मिशन अंतर्गत नळ जोडणी हर घर नल या तत्वावर सर्व कुटुंब नळजोडणी करुन देणे व सदरील सर्व entries ऑनलाईन करणे बाबत 31 डिसेंबर पर्यत कामे करण्याचे सुचविले
6.15 व्या वित्त आयोगातील खर्च सर्व मंजूर आराखड्यातील कामा नुसार कामे करुन उपलब्ध निधी खर्च करणे
7. MSRLM बचत गटाला सर्व परी मदत करुन त्यांचे बँकेतील कर्ज प्रकरणे मंजूर करणे गटातील प्रत्येक महिलेच्या उत्पन्नात वाढ करणेसाठी नियोजन करुन बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, ब्रॅण्डिंग करणे उत्पादनाची प्रचार प्रसिद्धी करणे
8. घरकुल योजना पत्रलाभार्थी निवड करुन शंभर दिवसात घरकुल पुर्ण करणे अपूर्ण घरकुल, डिल्ये हाऊस पुर्ण करणे त्यांच्या समस्या सोडवून मार्गदर्शन करणे….
9.नरेगा कामे सुरु करणे मजुरांना कामे उपलब्ध करुन द्या.
10) अपूर्ण व नवीन विहिरींची कामे सुरु करुन मार्च पूर्वी पुर्ण करणे 11) समृद्ध गाव बजेट आराखडा सर्वाना ग्रामसभेत विश्वासात घेऊन वयक्तिक व सार्वजनिक महत्वाचे कामे घेने. 12) कर्मचारी व लाभार्थी तथा ग्रामस्थ यामध्ये सुसंवाद ठेवून अधिकारी पदाधिकारी यांच्या समन्वयातून कामे करावीत अश्याच सूचना दिल्यात . सर्व जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती, अंगणवाडी बांधकाम जी सर्व मंजूर आहेत निधी उपलब्ध आहेत अशी सर्व कामे डिसेंबर पूर्वी पुर्ण करावे व निधी खर्च करावा. 

वरील कामाची पाहणी व सूचनाच्या अंमलबजावणी बाबत काय कार्यवाही केली याबाबत पुढील सभेत आढावा घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या वर कडक कार्यवाही करण्यात येईल असा सजग इशारा मा. Ceo यांनी सभेत उपस्थित सचिव ग्रामपंचायत व विभाग प्रमुख यांना दिला. काही सचिव व अधिकारी याची माहिती देताना तारांबळ उडाली तर काही जबाबदार सचिव व अधिकारी वर्ग यांच्यावर कार्यवृत्तांत मध्ये नोंदी घेऊ कार्यवाही करुन सेवा पुस्तकात नोंद घेण्याचे आदेश दिले.
वरील आढावा सभेत ma. Ceo यांनी सर्विस्तर सर्वच बाबीवर बारीक सारीक गोष्टींचा उलगडा केला त्यातील बारकावे शांत पणे समजावून सांगितले. परिसरात वस्तू विक्री सुरु असलेल्या बचत गटाच्या स्टॉल ला भेट देऊन स्वतः खरेदी पण केली.
वरील आढावा सभेला तालुक्यात सर्व समंधित जिल्हा परिषद प्रशासनाशी निगडित तालुका विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सचिव, टीम नरेगा, टीम स्वच्छ भारत मिशन, टीम msrlm, beo, cdpo, dy engi. शाखा अभियंता. पंचायत विभागाची टीम व सहाय्यक व कानिस्ट प्रशासन अधिकारी हजर होते…