दीक्षाभूमि येथे डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये संशोधन केंद्राचे उद्घाटन. 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– ग्रंथ भेट देण्याचे आवाहन

नागपूर :- दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विधी विभाग परिसरात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य भदन्त नागदीपंकर, प्रमुख अतिथी. स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, अॅड. आनंद फुलझेले, प्राचार्या डॉ. भूवनेश्वरी मेहेरे, उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी, उपप्राचार्या डॉ. दीपा पानेकर, ग्रंथपाल राजेश लोखंडे, सहायक ग्रंथपाल प्रसन्न मूल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या संशोधन केंद्राचा उपयोग समाजातील सर्वच घटकांना व्हावा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक कल संशोधन कार्याकडे होता.

त्याचप्रमाणे समाजातील संशोधक, बुद्धिजीवी, विद्यार्थी तसेच नागरिकांना या संशोधन केंद्राचा लाभ व्हावा, या उद्देशाने डॉ. सुधीर फुलझेले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नांतून या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या केंद्रास भेट द्यावी, ‘असे आवाहन स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीक्षाभूमीवरील केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथपाल राजेश लोखंडे यांनी केले व आभार मानले. सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंबाळा तिर्थक्षेत्र विकासाच्या प्रतिक्षेत - चौकसे

Thu Jun 1 , 2023
– मॉ गंगा दशहरा दिप महोत्सवप्रसंगी चंद्रपाल चौकसेंचे उद्गार – हजारो दिपांनी उजळून निघाला अंबाळा तलाव – महोत्सवादरम्यान हजारो नागरीकांची गर्दी रामटेक :- प्रख्यात अंबाळा तिर्थक्षेत्र येथे आज दि.३० मे च्या सायंकाळी ‘ माॅ गंगा दशहरा दिप महोत्सव ‘ मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला. यावेळी येथे मॉ गंगेची आरती व विविध धार्मीक कार्यक्रम पार पडले. दरम्यान हजारो दिपक अंबाळा तलावात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com