नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲरोबिक्स अँड फिटनेस स्पर्धेमध्ये मेगा आणि टिम इव्हेंटमध्ये एएसव्ही चमू आणि यूटी चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. नरेंद्र नगर येथील लक्षवेध मैदानात ही स्पर्धा पार पडली.
मेगा इव्हेंट प्रकारात १० वर्षाखालील वयोगटात एएसव्ही चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पँथर चमूने दुसरे आणि एसओएस चमूने तिसरे स्थान पटकाविले. १४ वर्षाखालील वयोगटात देखील एएसव्ही संघाने बाजी मारली. संजूबा चमूने दुसरे तर डीपीएस चमूने तिसरे स्थान प्राप्त केले. १७ वर्षाखालील वयोगटात एएसव्ही चमूने पहिला क्रमांक पटकाविला. डीपीएस चमूने दुसरा आणि संजूबा चमूने तिसरा क्रमांक प्राप्त केला.
टिम इव्हेंट प्रकारात १० वर्षाखालील वयोगटात यूटी चमूने पहिले, एएसव्ही चमूने दुसरे आणि डीपीएस चमूने तिसरे स्थान प्राप्त केले. १४ वर्षाखालील वयोगटात यूटी चमू पहिली आली. या स्पर्धेत एएसव्ही आणि यूव्ही क्लबने दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले. १७ वर्षाखालील वयोगटात यूटी चमूने विजय मिळविला. एएसव्ही आणि यूव्ही क्लबने क्रमश: द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील विजेत्यांना मनपाचे माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक संदीप गवई, माजी नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रितेश गावंडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक सौरभ मोहोड, भूषण केसकर, संजय पौनीकर, योगेश काथोके, नारायण वाघते, प्रांजली चित्रीव आदी उपस्थित होते.