संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- आगामी नगर परिषद निवडणुका लक्षात घेता शहरातील सर्व प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपल्या राजकीय हालचाली गतिमान करायला सुरुवात केली आहे.प्रभाग रचना जाहीर झाली असून अंतिम मतदार यादी व आरक्षण सोडत सुदधा झाली आहे.काही पक्षाच्या इच्छुकांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका साकारली आहे.कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरल्या जात आहेत.एकंदरीत सर्वच पक्षाचे इच्छुक सध्या गुडद्याला बाशिंग बांधून उभे झाले आहेत.
नुकतेच गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव,विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव झाला असून दिवाळी सण तोंडावर आहे.या सणोत्सवाच्या तोंडावर आपल्या जाहिरातीचे फलक लावून निवडणूक लढवनार असल्याचे दाखवून दिले.अनेक इच्छुक उमेदवारांनी सर्व सणोत्सवात सहभाग नोंदवित नागरिकासोबत संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर काही इच्छुक उमेदवारांनी अद्यापही ‘वेट अँड वॉच’ ला प्राधान्य दिले आहे.कनेक्टिव्हिटीचे अजब फंडेच्या इच्छुक उमेदवार व मतदारांशी संपर्क राहावे म्हणून वेगवेगळे फंडे वापरत आहेत.वाढदिवस इव्हेंट,वेगवेगळ्या मित्रमंडळींना जेवण पार्ट्या,होर्डिंग,सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश असे फंडे वापरत आहेत त्यामुळे इच्छुकांच्या कानेक्टिव्हिटीमुळे मतदारांची चांगलीच चंगळ होत आहे.