नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेमध्ये अश्विन मोकाशी, नैना गोखले, दिग्विजय आदमने, संजना जोशी यांनी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली.
अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलावामध्ये ही स्पर्धा पार पडली. 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 35 वर्षावरील वयोगटात अश्विन मोकाशी (03:00:25) आणि नैना गोखले (03:24:31) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. पुरुष गटात आदित्य कलेले (03:20:81) ने रौप्य आणि निजय मोहनानी (03:48:61) ने रौप्य पदक प्राप्त केले. महिला गटात अंजली गजभिये (04:29:31) आणि इश्वरी वाटकर (04:42:75) यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळविले.
200 मीटर बटर फ्लाय मध्ये दिग्विजय आदमने (02:42:50) आणि संजना जोशी (02:42:50) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. हृदय शर्मा (03:07:04) आणि अक्षता झाडे (03:47:57) रौप्य व राघव भार्गव (04:29:75) आणि रोमा मोरघडे ने कांस्य पदक पटकाविले.
निकाल
100 मीटर बटरफ्लाय
35 वर्षावरील पुरुष : आदित्य काळे (01:49:16), राकेश बारापात्रे (02:14:04), गणेश क्षीरसागर (02:17:25)
35 वर्षावरील महिला : अक्षय झंझाड, (02:29:03), ईश्वरी वाटकर (02:29:04), सुषमा बहपाई (03:21:75)
17 वर्षावरील पुरुष : धृव मिश्रा, 01:08:53, हृदय शर्मा 01:13:49, रुद्र ठाकुर 02:00:53
17 वर्षावरील महिला : संजना जोशी 01:23:34, अक्षता झाडे, मृण्मयी पानहल्क 02;12:15
17 वर्षाखालील पुरुष : रणबीरसिंग गौर 01:05:57, राजवीर रावत 01:07:44, आदित्य शर्मा 01:12:25
17 वर्षाखालील महिला : आदित्री पयासी 01:23:41, माही देशमुख 01:37:47, अरहान खान 01:31:87
100 मीटर फ्री स्टाईल
35 वर्षावरील पुरुष : अश्विन मोकाशी 01:14:75, अतुल तभाने 01:20:00, आदित्य कलेले 01:25:54
35 वर्षावरील महिला : नैना गोखले 01:23;87, अंजली गजभिये 02:00:44, ईश्वरी वाटकर 02:15:09
17 वर्षावरील पुरुष : यश गुल्हाने 00:57:87, धृव मिश्रा 00:59:22, रुद्र पालकृत 01:00:18
17 वर्षावरील महिला : रिद्धी परमार 01:12:87, प्रेरणा चापले 01:15:66, जिज्ञासा झाडे 01:47:38
17 वर्षाखालील पुरुष : रणबीरसिंग गौर 01:01:09, सागर चापले 01:05:46, हृदय गर्ग 01:06:47
17 वर्षाखालील महिला : आदित्री पयासी 01:10:84, अवनी देशपांडे 01:15:85, स्वराली साळुंके 01:16:63