नागपूर :- दिनांक १६/०२/२०२५ रोजी दुपारी १३:५५ वाजे दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एशीयन फायरवर्क कंपनी, कोतवाल वर्डी येथे अचानक स्फोट होवुन सदर कंपनीमध्ये काम करणाऱ्या २ कामगारांचा मृत्यु झाला व इतर ०३ कामगार हे गंभीर जखमी झाले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १०६(१), २८८ १२५ (बी) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याचा तपास सुरू आहे.
सदर गुन्हयात तज्ञांचा अहवाल प्राप्त झाला असुन तज्ञ निलेश उरकुंडे फॉरेन्सीक फायर आणि सायबर अन्वेषक यांनी एशीयन फायरवर्क कंपनी, कोतवाल बर्डी येथे स्फोट झाल्यानंतर दिनांक १७/०२/२०२५ आणि दिनांक १८/०२/२०२५ रोजी तपास अधिकारी अनिल मस्के उपविभागिय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सावनेर विभाग आणि स्थानिक पोलीस यांचा मदतीने घटनास्थळाचे बारीक परीक्षण केले आणि त्याद्वारे त्यांनी तज्ञ अहवाल सादर केला आहे. तज्ञ निलेश उरकुंडे यांनी अहवालात स्फोट होण्याची कारणे, मालकाचा निष्काळजीपणा, कमागारांचे अपुर्ण प्रशिक्षण, मॅनेजरच्य निष्काळजीपणा असा सविस्तर ५० पानांचा अहवाल दिलेला आहे. सदर तज्ञांचा अहवाला आरोपीविरूध्द मा न्यायालयात दोषारोप दाखल करते वेळी सादर केला जाणार आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे सोहेल अली अजगर अली अमीन याच्या विरूध्द मा. न्यायालयाने कलम ७५ भा.ना.सु.सं अन्वये नॉन वेलेबल वॉरंट काढलेला आहे. सदर प्रकरण अपवादात्मक असुन गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या ४ दिवसांत सदर गुन्हयातील आरोपी ला नॉन वेलेबल वॉरंट काढले. सदर नॉन बेलबल वॉरंट तामील करण्यासाठी पोलीस पुर्ण करत असुन सदर वॉरंट तामील करण्याकामी वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले आहे. तरीसुध्दा आरोपी हजर मिळून आला नाही तर कलम ८४ भा. ना.सु.सं अन्वये आरोपीला फरार उद्घोषीत करण्याची प्रकीया करण्यात येणार असुन त्याचा कालावधी संपल्यानंतर कलम ८५ भा.ना.सु.सं अन्वये आरोपीच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रीया न्यायालयां मार्फतीने केली जाणार आहे.