चंद्रपूरच्या आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

– आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार

नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा आज गौरव करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील सार्वजनिक आरोग्य परिचारीका सुश्री आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सुश्री आशा बावणे यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या टीकाकरण मोहिमेचे विशेष कौतूक झाले असून त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे त्या अनेक आरोग्य सेवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री अनुप्रिया पटेल, आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 पासून सुरू झाले असून वर्ष 2023 पर्यंत 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा

Thu Sep 12 , 2024
यवतमाळ :-  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील 10 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. युवकांना या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण योजनेंतर्गत मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे, उमेदवाराची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com