भंडारा :- जिल्हयाला जोणारे अनेक रस्ते हे भ्रष्टाचार व कमीशन खोरीमुळे एकाच पाण्यामध्ये वाहुन गेलेत तर काही रस्त्यावर भगदाड पडल्याने रोजच अपघाताची श्रृंखला सुरु असल्याने शहरातील नागरीकांच्या गार्हाण्यांची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभेचे अध्यक्ष अजय मेश्राम यांनी शहरातील काही रोडाचे परिक्षण केले. अनेक रोडावर अर्धा फुटापर्यंत भगदाड पडल्याने दुचाकी वाहनांना चालणेही मुश्कील दिसुन आले. अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याने अजय मेश्राम यांनी प्रशासनाने तात्पुरती तरी उपाययोजना करा म्हणून भगदाड बुजविण्याकरीता दोन दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.
आंदोलनाचा ईशारा देताच भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रोडावरील खड्ढे बुजविण्याचे काम हाती घेतल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. यामध्ये प्रथम गांधी चौक ते राजीव गांधी चौक येथील रोडावरील मोठे भगदाड बुजविण्याचे कामाला सुरवात करण्यात आली असून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होताच नागरीकांनी शहरातील सर्वच खड्डे लवकरात लवकर बुजविण्यासाठी अजय मेश्राम यांनी प्रयत्न करावे अशी देखील नागरीकांनी विनंती केली आहे.
शहरातील खड्ढे बुजविण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचे परिसरातील नागरीकांनी आभार व्यक्त केले, तर अजय मेश्राम यांनी तत्परता दाखविणारे नगर परिषदेचे मुख्यधिकारी करण चौव्हान यांचे देखील आभार मानले.
भंडारा नगर परिषद अंतर्गत रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम करणार्या आर्या कन्स्ट्रक्शन व अन्य कंपनीवर कार्यवाही करा
शहरात बहुतांश ठिकाणातील रोड हे आर्या कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने तयार केली असुन कंपनीच्या माध्यमाने शहरातील सिमेट रोड व काही ठिकाणी डांबर रोड तयार केले आहेत. या कंपनीच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या रोडाच्या बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने सिंमेट रोडावरील सिमेट हा पहिल्याच पाण्यात वाहून गेला आहे. मोठा बाजार ते रुग्णालय या रोड बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे दृष्य दिसून येत आहेत. सोबतच गांधी चौक ते राजीव गांधी चौक, मुस्लीम लायब्ररी ते त्रिमुर्ती चौक या रोडाच्या रेबावेन पटेल कालेज ते वस्तीगृहापर्यतचे रोड बांधकाम हे नुकतेच सहा महीणे पुर्वी झालेले असतांना बांधकामाला तळे साचले असून सद्यस्थितीत या रोडावर अर्धा फुट पर्यतचे खड्डे पडले असल्याने नागरीकांचे व विद्यार्थ्याचे या रोडावर जिव मुठीत घेवून आवागमन सुरु आहे. तरी आर्या कन्स्ट्रक्शन व अन्य कंपनीवर गेल्या तिन वर्षाचे बांधकामाबाबत चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे. आठ दिवसाच्या आत मागणी पुर्ण झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलनचा ईशारा देखील देण्यात आला आहे.