पारशिवनी :- पारशिवनी तालुकातिल ग्राम पंचायत केरडी च्या सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अर्तगत राज्य व्यवस्थापन कक्ष पुणे , जिल्हा व्यवस्थापन कक्ष ग्राम पंचायत विभाग जि प नागपुर व पंचायत समिती पारशिवनीच्या संयुक्त विद्यामाने “आमचा गाव आमचा विकास” या उपक्रम अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी चा वतीने ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्या करीता गणस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे बुधवारदिनांक १६/११/२०२२ ला केरडी गावा अंतर्गत जिल्हा परीषद शाळे मध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी सुभाष जाधव ,विस्तार अधिकारी नाईक , ग्राम सचीव,सरपंच, आरोग्य अधिकारी, याचे प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण मध्ये आशा वर्कर,अंगनवाडी शिक्षीका, जिल्हा परिषद शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम पंचायत संसाधन गट, महिला स्वम सहायता बचत गट, यांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले तसेच अनेक विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम विचार करण्यात आले .