महावितरणचे तब्बल 45 टक्केलघुदाब वीजग्राहक ‘ऑनलाइन’

नागपूर :- वीज ग्राहकांना सदैवच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या महावितरणने लघु व उच्चदाब ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधुनिक सुविधांचा वापत करीत महावितरणच्या नागपूर परिमंडलातील तब्बल 45 टक्के लघुदाब वीज ग्राहकांनी आणि शंभर टक्के उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे मागिल काही वर्षात ऑनलाईन वीजबिल भरणा-या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत नागपूर परिमंडलात दरमहा सरासरी साडेपाच लाख लघुदाब ग्राहक 160 कोटींपेक्षा अधिकच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या आणि सुरक्षितपणे करीत आहेत.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व “महावितरण मोबाईल ॲप” उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून pस्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रु. 5000 पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने आरटीजीएस/एनईएफ़टी व्दारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो तपशिल ग्राहक वर्गवारीनुसार वीजबिलावर देखील छापण्यात आलेला आहे.

महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून महावितरणच्या लघुदाबाच्या तब्बल साडेपाच लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल 51 टक्के रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये जून 2023 या महिन्याचा विचार केल्यास नागपूर शहर मंडलातील 3 लाख 74 हजार ग्राहकांनी सर्वाधिक 137 कोटी 51 लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. त्यानंतर नागपूर ग्रामिण मंडलातील 95 हजारापेक्षा अधिक ग्राहकांनी 25 कोटी 85 लाखाचा तर वर्धा मंडलातील 76 हजारापेक्षा धिक ग्राहकांनी 19 कोटी 84 लाखाचा ऑनलाईन भरणा केला आहे.

‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास 1 टक्का असे एकूण 1.25 टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवरवीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस भारतीय रिझर्व बॅंकेच्य पेमेंट व सेटलमेंट कायदा 2007 च्या तरतुदी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्याचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा अभियंता चिन्मय देशपांडे यांचा सत्कार

Wed Jul 12 , 2023
– एलएलबी अभ्यासक्रमात २ सुवर्ण पदक – महामहिम राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत झाला होता गौरव चंद्रपूर  :- एलएलबी अभ्यासक्रमात २ सुवर्ण पदके मिळविणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता चिन्मय प्रदीप देशपांडे यांचा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते १२ जुलै रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com