कोंढाळी :-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यां सर्व गुण संपन्न असावेत, त्यांना व्यासपीठावर भाषण तथा इतर कार्यक्रमांचा अनुभव असावा, समय सूचकता असावी , प्रत्येक क्षेत्रात तो अग्रेसर असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी अरविंद इंडो हायस्कूल कोंढाळी येथे सुरू केली व त्याचे ३०- व ३१जानेवारी ला स्नेहसंमेलन पार पडले.
अरविंद इंडो पब्लिक हायस्कूल चे विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडत आहे, त्याबद्दल सर्व विद्यार्थीचे कौतुक केले. अरविंद इंडो पब्लिक हायस्कूलचा विद्यार्थी हा नाण्या सारखा खनखणला पाहिजे, असे उदगार स्नेहसंमेलनाचे उद्घाटक डॉ रामपूरे यांनी केले.
तर व्यासपीठावर संस्थेचे व्यवस्थापन समितीचे गणेश ठवरे, पालक समिती चे प्रमुख प्रशांत गिरडकर व दुष्यांत बालपांडे तसेच प्राचार्य -निखिलेश कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत वार्षिक सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच लहान चिमुकल्यांनी खूप सुंदर असे नृत्य तथा नाटक इतक्या कमी दिवसात सराव करून विविध सांस्कृतिक सादर केले संस्थेच्या प्रांगणात 350 विद्यार्थ्यांचा समूह असलेला हा सोहळा हा थाटामाटात पार पडला. या प्रसंगी उपस्थित पालकांनी आप आपल्या चिमुकल्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक नृत्य /नाटिका सादर केले.
प्राचार्य निखिलेश कोल्हे, पर्यवेक्षिका शाहिस्ता खान, विश्वास देऊळकर यांनी ही याप्रसंगी मार्गदर्शन केले.
31जानेवारी ला त्रिमुर्ती हायस्कूल चे मुख्याध्यापक राजेंद्र खामकर यांचे उपस्थितीत विविध क्रीडा स्पर्धां चे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व विविध क्रीडा स्पर्धेचे यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी , विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.