नागपूर :- पत्रकार विनोद देशमुख सोशल मीडियावर सातत्याने लिहित असलेल्या ‘आरसा’ या प्रासंगिक स्तंभातील निवडक स्फुटांच्या संकलनाची डिजिटल पुस्तिका आज होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशित होत आहे.
16 नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या काळातील 40 स्फुटांचा समावेश असलेल्या या पुस्तिकेचे नामकरण “राजकारणातील फुटका आरसा” असे करण्यात आले आहे.