मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत आगमन

मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा

        नवी दिल्ली,६– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

         आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या  तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

           भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई

Sat Aug 6 , 2022
मुंबई, दि. 6 – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!