नागपूर :-महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारद्वारा करण्यात आलेल्या बहुजन महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्याचे दोन दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन जाहीर केले होते. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बसपा नेत्यांनी काळे झेंडे दाखवून अडथळा आणू नये म्हणून आज अगदी पहाटे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांना गिट्टीखदान पोलिसांनी व जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली होती.
बसपा कार्यकर्त्यांनी गिट्टीखदान व हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस प्रशासन व सरकारचा निषेध करण्याची घोषणा करताच पोलिसांनी या दोघांनाही मुक्त केले. बसपाचे सर्व कार्यकर्ते संविधान चौकात एकत्र होऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यावर विविध प्रकारची फलके व बॅनर हातात घेऊन पोलीस प्रशासन, मेट्रोरेल कार्पोरेशन, महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, उत्तर नागपूर विधान सभेचे अध्यक्ष जगदीश गजभिये, पश्चिम नागपूर विधानसभेचे अध्यक्ष सनी मुन, मध्य नागपूर विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे माजी प्रभारी नितीन वंजारी, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, अभिलेष वाहने, महिला नेत्या वर्षा वाघमारे यांनी या प्रसंगी शासनाच्या या मनुवादी कृतीचा निषेध व धिक्कार केला.
याप्रसंगी प्रामुख्याने युवा नेते सदानंद जामगडे, महिपाल सांगोळे, प्रकाश फुले, राजकुमार दांडेकर, एड विजय वरखडे, मॅक्स बोधी, वीरेंद्र कापसे, संभाजी लोखंडे, सुमित जांभुळकर, अनवर अंसारी, जनार्दन मेंढे, सुबोध साखरे, राकेश जांभुळकर, सहदेव पिल्लेवान, प्रशांत धनविजय, रोहित पाटील, आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.