संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर पालिकेत मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकले असल्याने नगर परिषद च्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे तसेच कामठी नगर परिषद अधिनस्थ असणाऱ्या 695 दुकानगाळ्या धारकाकडे सुदधा एक कोटीच्या घरात थकबाकी असून ते भाडे वसूल करण्याची मोहीम नगर परिषदने हाती घेतली आहे तेव्हा थकबाकी दारांनी कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
कामठी शहरातील बैलबाजार,शुक्रवारी बाजार, दुर्गा चौक, भाजी मंडी,राम मंदिर, पोरवाल कॉलेज समोर अशा इतर ठिकाणी कामठी नगर परिषद ने आपल्या मालकीच्या जागेवर दुकान गाळे उभारून ते गाळे भाडे तत्वावर व्यापाराकरिता देण्यात आले.या दुकानगाळ्यांच्या माध्यमातुन नगर परिषदला नियमित उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा होती. मागील वर्षीचा आलेख घेतला असता एकूण 695 गाळे धारकाकडून वार्षिक 1 कोटी 33 लक्ष 46 हजार 505 रुपये भाडे वसुली अपेक्षित होती मात्र फक्त 60 टक्के भाडे वसुली झाली असून चालू वर्षाची थकबाकी थकीत आहे,नगर परिषद प्रशासनाच्या वतीने वारंवार वारंवार भाड्याची मागणी करत असतानाही दुकानदार नियमित भाडे भरत नाही परिणामी नगर परिषद ला भाडे मिळत नसल्याने आजघडिला थकबाकी एक कोटीपेक्षा अधिक आहे परिणामी नगर परिषदच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.नगर परिषद ला दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे.उत्पन्न येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास देखील विलंब होत आहे.तेव्हा जे दुकानदार भाडे देण्यास टाळाटाळ किंवा अडथळा निर्माण करणार।अशा सर्व दुकानांना नगर परिषद कायद्या अंतर्गत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिली आहे.त्यामुळे नगर परिषद च्या दुकानगाळ्यतील दुकानदारांनी कारवाही होण्याआधी दुकानाचे भाडे नगर परिषद कडे जमा करून नगर परिषद च्या आर्थिक उत्पन्नात सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.