नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटात वाशिम येथील कुस्तीपटू अर्जुन गादेकर आणि कल्याणी गादेकर हे विजेते ठरले. झिंगाबाई टाकळी येथे ही स्पर्धा पार पडली.
पुरुष आणि महिला गटात नागपूरच्या कुस्तीपटूंना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वाशिमच्या कुस्तीपटूंनी दोन्ही गटात नागपूरच्या कुस्तीपटूंना मात देउन विजय मिळविला. पुरुषांच्या ७५ किलोपेक्षा वरील वजनगटामध्ये वाशिम येथील अर्जुन गादेकर ने नागपूर येथील विशाल ढाकेला चितपट देत विजेतेपदाची गदा उंचावली. यवतमाळ येथील पीयूष शर्मा यांनी तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या ६२ ते ७६ किलो वजनगटामध्ये वाशिम येथील कल्याणी गादेकर ने नागपूर येथील नंदनी साहु ला मात देत विजेतेपदावर मोहोर उमटविली. अमरावती येथील गौरी धोटे ने तिसरा क्रमांक पटकाविला.
माजी नगरसेविका संगिता गिऱ्हे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक दीपक गिऱ्हे, संदीप खरे, इश्वर मेश्राम, संजय तिरतवार, दयाराम भोतमांगे आदी उपस्थित होते.
निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)
कुमार मुले
वजनगट – ३५ किलो : साजन तुमसरे (भंडारा), अंश दमाहे (नागपूर जिल्हा), अंश जिवतोडे (चंद्रपूर)
४० किलो : कुणाल माहुले (नागपूर जि.), प्रिंस दमाहे (नागपूर जि.), प्रज्वल सेलोकर (भंडारा)
४५ किलो : यश पांडे (अकोला), अनील दळवे (अमरावती श), पीयूष बक्सरे (नागपूर)
५० किलो : प्रेम श्रीनाथ (अकोला), प्रणय बारस्कर (भंडारा), मंगेश खोकले (अमरावती)
कुमार मुली
३३ किलो : गुंजन दमाहे (नागपूर जि.), श्रावणी सहस्त्रबुद्धे (चंद्रपूर), स्वरा घोडेस्वार (नागपूर)
३६ किलो : राणी निकुळे (नागपूर जि.), कृतिका उपरकर (चंद्रपूर), महेक बतुले (नागपूर)
४० किलो : अश्विनी बावणे (नागपूर जि.), आरुषी बनकर (नागपूर जि.), चैतन्या आंबिलडुके (नागपूर)
४३ किलो : अंजली भालेराव (चंद्रपूर), अक्षरा लिल्हारे (नागपूर), ऐश्वर्या शिंगाडे (भंडारा)
४६ किलो : आरुषी मोहोरे (नागपूर जि.), परी जादुसंकट (अमरावती), प्रतिज्ञा कहालकर (भंडारा)
४९ किलो : प्रयनी कहालकर (भंडारा), सलोनी भंडारे (चंद्रपूर), अक्षरा वाडिवे (नागपूर जि.)
वरीष्ठ गट पुरुष
५३ किलो : रोहित गौरकार (चंद्रपूर), पीयूष ढेंढवाल (अमरावती), अब्दुल जाकीर (अमरावती)
५७ किलो : अर्जुन यादव (अमरावती), परिमल राउत (चंद्रपूर), ईशान्य गौर (अमरावती ग्रा.)
६१ किलो : हितेश सोनवारे (चंद्रपूर), नामदेव गुरुकुले (यवतमाळ), संजय मोहोरे (नागपूर जि.)
६५ किलो : अनूज सारवान (अमरावती), विजय कुवारीवाले (चंद्रपूर), अनिकेत शिरसाठ (अकोला)
७० किलो : चेतन गारघाटे (नागपूर), अंकीत यादव (अमरावती), अभिषेक जाबेराव (यवतमाळ)
७४ किलो : रामेश्वर वाघ (बुलढाणा), यशकुमार मेश्राम (नागपूर), राजेश चौधरी (अकोला)
७५ किलोपेक्षा अधिक : अर्जुन गोदकर (वाशिम), विशाल ढाके (नागपूर), पीयूष शर्मा (यवतमाळ)
वरीष्ठ गट महिला
५० किलो : सुप्रिया शिंगाडे (भंडारा), सोनाली गुप्ता (अमरावती), अवंती वानखेडे
५३ किलो : बाली पवार (अमरावती), कल्याणी मरसकोल्हे (भंडारा), रिया कामडे (चंद्रपूर)
५५ किलो : प्रांजल खोब्रागडे (नागपूर), प्रज्वली कहालकर (भंडारा), श्रुती टेंभुरकर (चंद्रपूर)
५७ किलो : ममता ढेंगे (भंडारा), मानसी कामडी (चंद्रपूर), सेजल झुंजुरकर (नागपूर)
५९ किलो : वंशिका चितोडे (चंद्रपूर), शर्वरी अतकरी (भंडारा)
६२ किलो : कल्याणी मोहारे (नागपूर जि.), माही अवघडे (चंद्रपूर), प्रांजली कावनपुरे (नागपूर)
६२ ते ७६ किलो :
कल्याणी गादेकर (वाशिम), नंदनी साहु (नागपूर), गौरी धोटे (अमरावती)