जिल्ह्यातील 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे झाले वाटप

– जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण

– दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रतिनिधीक लाभार्थी झाले सहभागी

नागपूर :- देशातील कोणताही व्यक्ती आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत आज जिल्ह्यातील सूमारे 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. याचबरोबर तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (2024-25) अंतर्गत राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागामार्फत पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत आज विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते.

येथील जिल्हा परिषदेच्या स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या प्रातिनिधीक स्वरुपात 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीपत्राचे वितरण करण्यात आले. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरही दूरदृष्य प्रणालीद्वारे लाभार्थी सहभागी झाले होते.

पुणे येथील मुख्य समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोड व मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, ग्रामविकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव व वरिष्ठ अधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आजनगाव केंद्राने साजरी केली केंद्रस्तरीय शिवरत्न सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन अनोखी शिवजयंती 

Sun Feb 23 , 2025
अरोली :- बाबदेव – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केंद्र आजनगाव येथे प्रेरणादायी, आदर्श, अखंड अनुकरणीय असे केंद्रस्तरीय शिवरत्न सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. केंद्रप्रमुख डॉ. शिल्पा सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून शिवजयंती पूर्वदिनी केंद्रातील इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय शिवरत्न सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिवरायांचा इतिहास अभ्यासावा हाच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!