नागपूर :-पाच छात्र सैनिकांची सैन्य दलात अधिकारी व सैनिक निवडी बद्दल त्यांच्या आई-वडिलांचास सत्कार करण्यात आला तसेच छात्र सैनिकाच्या वेगवेगळ्या यशाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच आर डी सी-2023 पंतप्रधान रॅली मधील निवडीबद्दल एसयुओ देवांशू कानफाडे यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी, येथे डॉ.आंबेडकर महाविद्यालय व डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कर्नल आमोद चांदना (कमांडिंग ऑफिसर 20 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई तर विशेष अतिथी कर्नल मनूज मजुमदार (प्रशासकीय अधिकारी, 20 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी यांनी सर्व पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर सांस्कृतिक व देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करण्यात आले.
याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले तसेच स्मारक समितीचे सदस्य एन.आर.सुटे, डॉ.प्रदीप आगलावे, प्राचार्या डॉ.बी.ए मेहेरे यांच्यासह उपप्राचार्य, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारीगण उपस्थित होते. संचालन महाविद्यालयाचे एन.सी.सी अधिकारी कॅप्टन डॉ. सुजित चव्हाण यांनी तर आभार प्रा. विकास सिडाम यांनी मानले.