नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिला तारांवर उभा असलेला (केबल स्टेड) रेल्वे पूल असलेला अंजी खड्ड पूल पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
हा पूल 11 महिन्यांत पूर्ण झाला असून या पुलामध्ये एकूण 653 किमी लांबीचा तारांचा दोरखंड (केबल स्ट्रँड) वापरण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“उत्कृष्ट”