संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला पदाधिका-यांची नियुक्ती

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी 

 कन्हान (नागपुर) : – संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपुर जिल्हा‌ संस्थापक सचिव अजय धोपटे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे यांच्या हस्ते संगीता वांढरे कार्याध्यक्षा रामटेक विधानसभा क्षेत्र महीला आघाडी‌ पदावर नियुक्ती करण्यात आली. तर जागृती पडोळे यांची अध्यक्ष कांद्री शहर महीला आघाडी, दुर्गा सरोदे उपाध्यक्ष कांद्री महिला आघाडी, मीरा आंबीलडुके सहसचिव कांद्री महिला आघाडी पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच मीना कळंबे यांची अध्यक्षा कन्हान शहर महिला आघाडी,सविता डांगरे सहसचिव कन्हान शहर महिला आघाडी पद्दी नियुक्ती करण्यात आली. वरील सर्वांना नियुक्तीझाल्याबद्दल व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी  प्रतिभा कुंभलकर अध्यक्षा पारशिवनी तालुका व नगराध्यक्षा नगर परिषद पारशिवनी, कामिनी हटवार कार्याध्यक्ष मौदा तालुका महीला आघाडी, अमोल साकोरे अध्यक्ष युवा आघाडी रामटेक विधानसभा क्षेत्र श्रीराम हटवार उपाध्यक्ष नागपुर ग्रामिण, संजय बडवाई‌ अध्यक्ष युवा आघाडी दक्षिण नागपुर,  अरविंद नरंड, भगवान सरोदे, योगेश आखरे, आयुष देशमुख, यशवंत आंबिलडुके, शुभम वांढरे, सुरज कळंबे सह इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षकाचे ऋण विद्यार्थ्यांनी सतत स्मरणात ठेवावे - अरविंदकुमार रतुडी 

Mon Feb 27 , 2023
सेवादल महिला महाविद्यालयात विद्यार्थी पालक सभा संपन्न  नागपूर :-शिक्षक हा विद्यार्थ्यांचा किंबहूना देशाचाही भागयविधाता असतो. निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शिक्षक आपल्या प्रतिभेने पैलू पाडून विद्यार्थ्यांचे जिवन तेजोमय करित असतो. म्हणून शिक्षकांचे ऋण विद्यार्थ्यांनी सदैव स्मरणात ठेवावे असे आवाहन सुप्रसिद्ध समाज सेवक व सेवादल महिला महाविद्यालयाच्या पालक संघटनेचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांनी केले. सेवादल महिला महाविद्यालयात आयोजित पालक विद्यार्थी सभेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com