संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 : डी एस फोर ,बामसेफ, बहुजन समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष कांशीरामजी जयंती निमित्त कामठी विधानसभेच्या वतीने संघटनात्मक विषयावर आज 16 मार्च ला कामठी येथील सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशचे सचिव नितीन शिंगाडे त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी व कामठी विधानसभेचे अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित वरिष्ठ पदाधिकारीच्या मुख्य उपस्थीतीत बसपा कामठी विधानसभा सचिव पदी सुधाताई रंगारी तसेच कोषाध्यक्ष पदी अशोक गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवर तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला .यावेळी दोन्ही नवनियुक्त सुधा रंगारी तसेच अशोक गजभिये यांनी पक्ष संघटन बळकटी साठी सदैव कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले.व नियुक्ती बद्दल नियुक्त करणाऱ्या समस्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.