मनपातील पहिल्या प्रशिक्षणार्थीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नियुक्ती  

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देउन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारीला शुक्रवारी (ता.२) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.

सिव्हिल लाईन्स येथे निर्मित नवीन जिल्हा नियोजन भवनचे आज शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मनपामध्ये सामान्य प्रशासन विभागात नियुक्त लाभार्थी नेहा मंडारी यांना उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र दिले. मनपा तर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी 9, कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी 3,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी 4, विद्युत अभियांत्रिकी सहायक पदासाठी 1, अग्निशामक विमोचक पदासाठी 7, कनिष्ठ लिपीक पदासाठी 6 व वायरमॅन पदासाठी दोन प्रशिक्षणार्थीची निवड शुक्रवार(2) पर्यंत करण्यात आली आहे.

याप्रसंगी खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, डॉ. परिणय फुके, मोहन मते, विकास कुंभारे, अनिल देशमुख, डॉ. नितीन राउत, कृष्णा खोपडे, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये ४०४ पदांवर अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी पात्र युवकांकडून rojgar.mahaswayam. gov.in या संकेतस्थळावर अर्ज आमंत्रित करण्यात आले. प्राप्त अर्जांमधून आता प्रशिक्षणार्थींची निवड केली जात आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, अग्निशामक विमोचक, कनिष्ठ लिपीक, स्वच्छता निरीक्षक, सहायक शिक्षक (यु.डी.टी. माध्यमिक), सहायक शिक्षक (एल.डी.टी. माध्यमिक), वृक्ष अधिकारी, वायरमन या पदांवर ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत प्रशिक्षणार्थींची निवड केली जात आहे. या अंतर्गत १२वी उत्तीर्ण उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिग्रस येथील कब्रस्थान विस्तारीकरणाची कारवाई तातडीने करा - पालकमंत्री संजय राठोड

Sat Aug 3 , 2024
– दिग्रस येथील विविध विषयांचा आढावा यवतमाळ :- दिग्रस येथी कब्रस्थान फार जुने आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विस्तारीकरणासाठी संपादीत केल्या जात असलेल्या जागेचे हस्तांतरण तातडीने करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. दिग्रस येथील विविध विषयांचा राठोड यांनी महसूल भवन येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!