यवतमाळ :- आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे. असा विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या एकलव्य रेसिडेंशियल स्कुल व शासकीय आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय तसेच इतर शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विविध पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरीता परदेशातील विद्यापीठांमध्ये जागतिक रँकींग ३०० पर्यंत निवड झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सदर विद्यापीठांचे निवड झाल्या संबंधिचे पत्र व फी स्ट्रक्चरचा कागदोपत्री पुरावा जोडून विहित नमुन्यात अर्ज कार्यालयास सादर करावा.
विहित नमुन्यात अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र २०२४-२५ करीता विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 31 ऑगस्टपर्यंत प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.