जेष्ठ साहित्यीक व कलावंतांकडून मानधन सन्मान योजनेकरीता अर्ज आमंत्रित

गडचिरोली :- पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ अन्वये राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना शासनाने लागू केलेली असून, जिल्हयातील पात्र साहित्यीक व कलावंत यांनी विहीत नमूना परिशिष्ट-१ मध्ये आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव विहित अटीची पुर्तता करुन गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे मार्फतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, गडचिरोली या विभागात दिनांक २३ ॲगस्ट २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केलेले आहे.

योजनेच्या पात्रतेसाठी अटी : महाराष्ट्र राज्याचा रहीवासी, केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासीक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले पात्र कलाकार, वय ५० पेक्षा जास्त असावे, दिव्यांग कलाकारासाठी वयोमर्यादा ४० वर्ष आहे. कला व साहित्यीक क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्ष आवश्यक. वयाने जेष्ठ असणारे विधवा परितक्त्या दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गाने कुटूंबाचे वार्षिक उत्तपन्न रुपये 60 हजार पेक्षा जास्त नसावे व सद्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नसावे. अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या कलावंतांनी योजनेसाठी अर्ज करावे, असे रविंद्र कणसे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हयात सप्टेंबरपासून पशुगणना, पशुपालकांनी अचुक माहिती द्यावी - पशुसंवर्धन उपआयुक्त

Mon Aug 19 , 2024
गडचिरोली :- 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या 1 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षानी पशुगणना केली जाते. या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडुन धोरण, योजना आखल्या जातात व त्यानुसार निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधाचा पुरवठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com