चुकीने राईट टु गिव्ह अप ऑप्शन निवडलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा

यवतमाळ :- शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतांना महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Option या पर्यायाचे बटन अनावधानाने किंवा चुकीने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलवर प्रिन्सिपल लॅागिनवरून भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. असा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांशी संपर्क साधून नव्याने फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Option या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रिन्सिंपल लॉगिनला महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्या अनुषंगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने RIGHT TO GIVE UP पर्याय निवडला गेला आहे, असा विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगिन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION या पर्यायाचा वापर करुन आपला अर्ज दिनांक 30 जून पुर्वी Revert Back करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि. 30 जून पुर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच फेरसादर करणे आवश्यक आहे.

विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी अथवा त्याच्या महाविद्यालयाची राहील, याची महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवताप जनजागरण, डेंग्यु सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात

Wed Jun 26 , 2024
– पावसाळ्यात होणारे किटकजन्य आजार टाळण्यासाठी जनजागृती अभियान यवतमाळ :- हिवताप, डेंग्यु, चिकुनगुण्या, मेंदुज्वर, चंडिपुरा यासारखे आजार होऊ नये यासाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी दरवर्षी दि.1 ते 30 जुन या कालावधीत किटकजन्य आजार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जनजागरण व डेंग्यु सर्वेक्षणास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरु होताच ठिकठिकाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com