दुध उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Ø शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान

Ø दुध भुकटी निर्यातीसाठी 30 रुपये

यवतमाळ :- राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट, 8.5 एसएनएफ या गुणप्रतीच्या गाय दुधाला किमान 30 रुपये प्रतीलिटर इतका दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये 5 प्रतीलिटर देण्यात येईल. योजनेत सहभागासाठी जिल्ह्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डशी व पशुधनाच्या इयर टँगशी लिंक असणे आवश्यक असेल. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी दुध संघ व खाजगी प्रकल्पांनी विहीत नमुन्यात आयुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दुध संघाने योजनेत सहभागी होण्यासाठीचा ठराव, संघाचे नोंदणी प्रमाणपत्र, पावर ऑफ अॅटर्नी, दैनंदिन दुध संकलन व विनियोग या बाबतचा तपशील पिशवी बंद, दुध भुकटी, उपपदार्थ, ठोक विक्री, एफएसएसएआयचे प्रमाणपत्र, संचालक मंडळाची यादी जोडणे आवश्यक. खाजगी दूध प्रकल्पांनी वरील बाबींसह उद्योग विभागाचे कारखाना, प्रकल्प नोंदी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्जासोबत डाटा मेकर व डाटा चेकरचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडीची माहिती सादर करावी. आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव ddcmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, एमआयडीसी लोहारा, यवतमाळ येथे सादर करावे.

यापुर्वी 5 रुपये अनुदान योजनेंतर्गत देण्यात आलेले युजर आयडी व पासवर्ड हे दि.1 जुलै पासून सुरु होणाऱ्या अनुदान योजनेस इनव्हॅलीड असतील. त्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी युजर आयडी व पासवर्ड मिळण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, मुंबई यांच्याकडे वरील ईमेल आयडीवर नव्याने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ.जया राऊत यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरी सुविधेसाठी मनपाकडे आणखी ७ सक्शन मशीन मलनि:स्सारण वाहिन्यांच्या तक्रारींच्या निराकरणाला येणार गती

Tue Jul 30 , 2024
नागपूर :- मलनि:स्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेमध्ये दिरंगाई झाल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने नागरी सुविधेसाठी आणखी ७ सक्शन कम जेटिंग मशीन मागविल्या आहेत. सोमवार (ता.२९) पासून या सक्शन मशीन नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. पावसाळ्यात मलनि:स्सारणाच्या वाढत्या तक्रारींचे त्वरीत निराकरण व्हावे व नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवीन सक्शन मशीन मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com