निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी राहुल कुमार यांचेकडे निवडणूक विषयक तक्रारी देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

• देसाईगंज सुरक्षा कक्षाची पाहणी

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून आता राहुल कुमार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आले आहे. यापूर्वी अनिमेष कुमार पराशर हे सामान्य निरीक्षक म्हणून जबाबदारी पाहात होते.

निवडणूक निरिक्षक राहुल कुमार सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात मुक्कामी राहणार असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9420067626 आहे. तसेच कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132-222024 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी 11 ते 12 या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

राहुल कुमार आज गडचिरोली येथे रूजू झाले. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  राहुल कुमार यांनी निवडणुक निरीक्षक म्हणुन रुजू होताच आरमोरी विधानसभा मतदारसंघात भेट निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी देसाईगंज येथील तहसिल कार्यालयातील सुरक्षा कक्षाची पाहणी करुन स्ट्रॉंग रूमच्या सभोवताची सिसीटीव्ही कॅमेरे, विद्युत व्यवस्था, पोलीस सुरक्षा, अग्निशामक यंत्र, ईव्हीएम साठवणूक कक्ष इत्यादी व्यवस्थेबाबत आढावा घेतले. याप्रसंगी सहायक निवडणूक अधिकारी मानसी तहसिलदार प्रिती डुडुलकर, प्रशांत गड्डम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिसुचना

Wed Apr 10 , 2024
नागपूर :-ज्याअर्थी, माझे असे निदर्शनास आले आहे की, दिनांक 10.04.2024 रोजी पंतप्रधान, भारत सरकार यांचा नागपूर कन्हान येथील कार्यक्रम आयोजीत असुन मान्यवर हे कन्हान येथील जाहिर सभेला संबोधित करणार आहे. त्याअनुषंगाने त्यांचे सूरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागपूर वाहतूक पोलीसांकडून वाहतूकीचे दृष्टीने मान्यवरांच्या दौरा कालावधीत आवश्यकतेनूसार आवागमनाचे मार्गावर विविध ठिकाणी बॅरीकेटींग करून वाहतूक तात्पूरती थांबविण्याची / वलविण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी अशी खात्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com