शिष्यवृत्ती अर्जाबाबत महाविद्यालय व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

नागपूर  : शैक्षणिक सत्र 2022-23 करिता Mahadbtmahait.gov.in हे शिष्यवृत्ती/फ्रिशीपचे फार्म भरणेस्तव पोर्टल सुरु झालेले आहे. महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर प्रवेशित असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज आवश्यक असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करुन तात्काळ भरुन घेण्यात यावे व त्यासंबंधीच्या सूचना महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात तसेच सुचनाफलकावर सुचना लावण्यात यावी.

तसेच शैक्षणीक सत्र 2019-20, 2020-21 व 2021-22 मधील प्रलंबीत शिष्यवृत्ती/फ्रिशीपचे पात्र अर्ज निकाली काढणे करिता प्रकल्प कार्यालयाकडून महाविद्यालयांना वारंवार पत्रव्यवहार व्दारा, ई-मेलव्दारा, व्हॉटसप व्दारा महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना फोनव्दारे तसेच महाविद्यालयातील शिष्यवृत्ती हाताळणा-या लिपीकांची बैठक घेवुन सुचित करण्यात आलेले आहे. तरिसुध्दा शैक्षणीक सत्र सन २०१९-20 मधील 53, 2020-21 मधील 95 व 2021-22 मधील 332 अर्ज महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबीत असल्याचे या कार्यालयाच्या लॉगीनवर दिसून येत आहे. त्याअनुषंगाने आपण आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची परिपूर्ण तपासणी करुन पात्र असलेले अर्ज या कार्यालयाच्या लॉगीनवर सेंड करावे.

महाविद्यालयातील शिष्यवृत्ती हाताळणा-या लिपीकाने विद्यार्थ्यंनी भरलेल्या शिष्यवृत्ती/ फ्रिशीप अर्जाची व आवश्यक असणा-या सर्व कागदपत्राची ऑनलाईन तपासणी करण्यात यावी. शिष्यवृत्ती /फ्रिशीप करिता पात्र असलेले सर्व अर्ज पुढील कार्यवाही करिता प्रकल्प कार्यालयाच्या लॉगीनवर सेंड करण्यात यावे. शिष्यवृत्तीचे परिपुर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहीत व पोर्टल बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याला हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्वांना नोंद घ्यावी. महाविद्यालयाने ऑनलाईन परिपुर्ण पात्र असलेलेच अर्ज या कार्यालयाला मंजूरीकरीता ऑनलाईन सादर करणे तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्रिशीप अर्ज भरणे करिता प्रकल्प अधिकारी नयन कांबळे यांनी महविद्यालयाला व विद्याथ्यांना आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंगणा-वाडी वखार केंद्रातील साठा सोयीसुविधा व सवलतीचा लाभ घ्यावा

Fri Dec 16 , 2022
नागपुर : वखार महामंडळाच्या नागपूर विभागातील हिंगणा-वाडी वखार केंद्रावर एकूण 26.465 मेट्रिक टन इतकी साठवणूक क्षमता आहे. हिंगणा-वाडी वखार केंद्र गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती व औदयोगिक मालाची साठवणूक केली जाते. या सोयीसुविद्या व सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वखार महामंडळातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामाचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com