सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत अनुपालन करण्याचे आवाहन

नागपूर :- राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडीट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे वर्ग-4 चे कर्मचारी वगळता प्रधान महालेखाकार (ले. व ह.)-2 कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील लेखे ठेवले जातात. अशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह लेख्यांचे वर्ष 2023-24 करिता वार्षिक विवरण या कार्यालयाच्या https://smswebservicesagaemaharashtra२ .cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या सेवार्थ पोर्टल https://sevaarth.mahakosh.gov.in वर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचारी आपले वार्षिक विवरण व मार्गदर्शीका या संकेतस्थळ व पोर्टलवर पाहु शकतात.

प्रधान महालेखाकार कार्यालयामधून कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात भविष्य निर्वाह निधी लेख्यामध्ये जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रीम राशी, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम आहारणाच्या आवेदनाची प्राप्ती व प्राधिकृत होण्याबाबतचा मोबाईल संदेश प्राप्त होतो. त्यासाठी राज्य शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना प्रधान महालेखाकार कार्यालयात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसेल त्यांना fm.mh२.ae@cag.gov.in या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे संपूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक, व सेवार्थ आयडीसह पाठविण्याचे आवाहन या कार्यालयाने केले आहे.

भविष्य निर्वाह निधी विविरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व जन्मतारीख तपासून घेण्याचे व त्यात तफावत आढळ्यास सेवार्थ प्रणालीत सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्याद्वारे या कार्यालयास दुरुस्तीसह gpfpakrarngp@gmail.com वर पाठवावा असेही सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मासिक अभिदानाची राशी अथवा घेतलेल्या अग्रिम भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या माध्यामातून कोषागाराकडे पाठविण्याचेही सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चाकूने स्वत:चा गळा चिरून घेतला जीव

Wed Jul 31 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर,रामगढ येथे पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून संतप्त पतीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने स्वतःचा गळा चिरून जीव घेतल्याची घटना काल रात्री दहा दरम्यान घडली असून मृतक पतीचे नाव अफरोज खा जावेद खा पठाण वय 27 वर्षे रा आनंद नगर,रामगढ कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!