नागपूर :- ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात साजरा झाला.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात विभागीय चौकशी समितीच्या प्रमुख दिपाली मोतियेळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी देशभर ‘ दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून साजरी करण्यात येते.