अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बस स्टँड जवळ अज्ञात टिप्पर ने मोटारसायकला धडक दिल्याने जागीच एक मुलगा मृत झाला होता.तर आता आलेल्या माहितीनुसार दुसरा मुलगा धुरुप कांबळी वय 15 वर्षे याला नागपुर ला उपचारासाठी नेत असतानाच खरबी जवळ वाटेतच मृत्यू झाला आहे.
तर वडिल सुरेश कांबळी यांच्या वर भंडाराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.भरधाव अज्ञात टिपर चालकाने धडक दिल्याने आज दोन मुलांचा जीव गेला आहे. अवैध मुरुम परिसरात सुरू असून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत टिपर चालक रस्त्यावरून भरधाव वेगाने गाडी चालवत असतात अशी चर्चा सुरू आहे .अशा वेळेस अपघात शक्यता नाकारता येत नाही.आता अज्ञात टिपरचा पोलिसासमोर शोध घेणे आता मोठे आव्हानच राहील.